आठरावा वर्धापन दिन १४ डिसेंबर २०१४ रोजी डोंबिवली येथील ‘स्वयंवर सभागृहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्रीरंग देशमुख तर अध्यक्षा म्हणून सौ. भाग्यश्री साठे यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. सत्कारमूर्ती श्री देव साहेब होते. अपंगालयातील सेवक वर्ग आणि आजी आजोबांच्या यानिमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. रोटरी क्लब तर्फे चालवण्यात येणार्याण मूकबधिर मुलांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. भारती मुश्रीफ यांनी अपंगालयातील रहिवासी व्यापारी आजी यांनी केलेल्या लिखाणाचे संवादवाचन केले. सुबोध साटम याने केलेल्या लिखाणाचे वाचन छोटी कार्यकर्ती रोशनी धुरंधर या चुणचुणीत मुलीने साभिनय सादर केले. अपंगालयातील रहिवाशांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर भरारी संस्थेची माहिती देणारा दहा मिनिटांचा महितीपट दाखविण्यात आला. नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. तसेच देव साहेबांचा सत्कार करण्यात आला. तसेच दोन व्हील चेअर नागालँडमध्ये पाठविण्यासाठी देण्यात आल्या आणि कल्याणच्या सदिच्छा शाळेतील एका मतिमंद मुलाच्या पुनर्वसनासाठी घरघंटी देण्यात आली.
पोपटीचा कार्यक्रम संस्थेच्या नार्हेान येथील नवीन जागेत केला. १२ जानेवारी रोजी नवीन जागेचे गणेश पूजन होऊन सीमारेषा आखण्यात आल्या.
१ मार्च २०१५ या दिवशी अपंगालयातील रहिवासी श्रीमती रमा पंडित आजीच्या शंभरीनिमित्त अभिष्टचिंतन व होम हवन करण्यात आले.
२१ मार्च २०१५ रोजी डोंबिवलीच्या नववर्ष शोभायात्रेत प्रतिवर्षीप्रमाणे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यां नी व अपंगालयातील रहिवाशांनी उस्फूर्त सहभाग घेतला. भरारीच्या चित्ररथाला यावर्षी पारितोषिक मिळाले.
३० जून २०१५ रोजी अधिक महिन्यानिमित्त कुंकुमार्चन, १६ सप्टेंबर रोजी दीड दिवसांचा गणपती उत्सव, २७ ऑक्टोबर रोजी भोंडला व १ नोव्हेंबर २०१५ रोजी सत्यनारायण पुजा असे विविध कार्यक्रम झाले.
६ सप्टेंबर २०१५ रोजी अपंगांची वर्षासहल कर्जतजवळ आंबेजोगाई दर्शन आणि टिटवाळा येथे श्री शेंबेकर यांचे फार्महाऊस वर गेली होती.
वार्षिक अहवाल काळात रेणुका कला मंच, धैर्य फाऊंडेशन, उमेद, मैत्री गीत मंच अशा विविध सामाजिक संस्थांनी भेटी दिल्या. त्यांनी विविध कार्यक्रम करून अपंगालयातील रहिवाशांचे मनोरंजन केले.
एकोणिसावा वर्धापन दिन १३ डिसेंबर २०१५ रोजी डोंबिवली येथील ‘स्वयंवर सभागृहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आमोद काळे, आर्थोपेडिक सर्जन – शुश्रुषा हॉस्पिटल यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. पुण्याच्या सौ. मेधा कुलकर्णी या विशेष अतिथी होत्या. ज्येष्ठ शुभचिंतक मा. श्री आबासाहेब पटवारीही सपत्नीक आशीर्वाद देण्यात आले होते. अपंगालयातील सेवक वर्ग आणि आजी आजोबांच्या यानिमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. रोटरी क्लब तर्फे चालवण्यात येणार्याज मूकबधिर मुलांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. अपंगालयातील रहिवाशांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. श्री राणे यांना स्व. भाऊ प्रधान यांच्या वेशभूषेत स्टेजवर आणून भाऊंच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक सुंदर नृत्य आधीश मालवणकर याने सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर भरारी संस्थेची माहिती देणारा दहा मिनिटांचा महितीपट दाखविण्यात आला. नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. नंतर प्रख्यात नृत्यांगना सौ. ज्योती सिधये यांनी आपल्या शिश्यांसाह “आई” या विषयावर, स्त्री जन्माला येण्यापासून वृद्धत्वापर्यंतची सर्व रुपे नृत्याद्वारे सादर केली. तसेच प्रथमच सौ. संध्या प्रधान यांच्या संकल्पनेतून कै. भाऊ प्रधान यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘भाऊ तिथे खाऊ’ या नावाने खाद्यपदार्थांची स्पर्धा घेण्यात आली.
१० जानेवारी २०१६ रोजी पोपटीचा रंगतदार कार्यक्रम संस्थेच्या नार्हेयन येथील जागेत झाला. सुमारे १५० कार्यकर्ते सहभागी झाले होते॰
८ एप्रिल २०१६ रोजी डोंबिवलीच्या नववर्ष शोभायात्रेत प्रतिवर्षीप्रमाणे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यां नी व अपंगालयातील रहिवाशांनी उस्फूर्त सहभाग घेतला. भरारीच्या चित्ररथाला याही वर्षी पारितोषिक मिळाले.
२५ डिसेंबर २०१५ रोजी नाताळ, १५ एप्रिल २०१६ रोजी रामनवमी, ७ मे २०१६ रोजी चैत्रगौरीचे हळदीकुंकू, १५ जुलै २०१६ रोजी आषाढी एकादशी,२४ जुलै रोजी सत्यनारायण पुजा, १३ ऑक्टोबर २०१६ रोजी भोंडला २८/२९ ऑक्टोबर २०१६ रोजी दिवाळीचा सण असे विविध कार्यक्रम झाले.
१६ ऑक्टोबर २०१६ रोजी अपंगांची वर्षासहल लोणावळा येथे गेली. स्वामी समर्थ मठ, नारायणी धाम हे जैनांचे मंदिर तसेच सुनील कंडलूर यांचे सेलिब्रिटी वॅक्स म्यूजियम याला भेट दिली.
११ दिव्यांग आणि १३ सदस्य आणि कार्यकर्ते यांची १२ दिवसांची अंदमान सहल १६ फेब्रुवारी २०१६ ते २७ फेब्रुवारी २०१६ दरम्यान गेली होती. काला पत्थर बीच,बारटांग व लाईम स्टोन केव्हज, पोर्टब्लेअर सिटि टूर, सेंट्रल जेल चाथम सॉ मिल, चेरी ऑन द पाय बीच सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहून आनंद वाटला. सर्व ठिकाणी आमचा टूर मॅनेजर शेखर आणि त्याचे सहकारी यांनी दिव्यांगांना सर्व ठिकाणी व्यवस्थित भेट देऊन आनंद घेता यावा यासाठी खूपच कष्ट घेतले.
वार्षिक अहवाल काळात ग्लोबल मालवणी संस्थेचे कार्यकर्ते, फेविकॉल कंपांनीतर्फे मनोज विश्वकर्मा व सहकारी, रोशनी पाटेकर व तिचे सहकारी, वंदे मातरम कॉलेज, डोंबिवली येथील विद्यार्थी, वाढदिवसानिमित्त दूरदर्शनवरील नवोदित अभिनेत्री कु. अमृता पवार, डोंबिवलीच्या पेंढरकर कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच काही विद्यार्थी व नोकरदार मुलामुलींचा एक अनामिक ग्रुप यांनी संस्थेला भेट दिली. त्यांनी विविध कार्यक्रम करून अपंगालयातील रहिवाशांचे मनोरंजन केले. तसेच इनरव्हील क्लब, डोंबिवली पश्चिम, टिळकनगर ज्येष्ठ नागरिक संस्था, डोंबिवली पूर्व, मनस्वी फाऊंडेशन, मुंबई या संस्थांनी भरारीला भेट दिली.
२ सप्टेंबर २०१६ रोजी कल्याण महिला मंडळाला ८१ वर्षे पूर्ण झाल्याने मंडळाच्या सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला. मातृदिनाचे निमित्त साधून भरारीच्या कार्याध्यक्षा डॉ. अंजली आपटे यांचा सत्कार करण्यात आला.
१६ एप्रिल २०१६ रोजी भरारीची एक प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी रोशनी धुरंधर हिच्या केळवणाचा कार्यक्रम झाला. पंचपक्वान्नाचे जेवण झाल्यावर संस्थेतर्फे साडी व भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
१ मे २०१६ रोजी ‘भरारी तिमिरातून तेजाकडे – भाग २’ आणि ‘दरवळ’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. अच्युत गोडबोले, सुधीर जोगळेकर, नाना अनगळ, मोहन जोशी इत्यादि मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा सोहळा संपन्न झाला. ‘भरारी तिमिरातून तेजाकडे – भाग २’ चे वैशिष्ट्य म्हणजे अंध जोडपी, मूक-बधीर जोडपी तसेच मतीमंदांचे पालक यांनी लिहीलेल्या लेखांचे यात संकलन आहे. ‘दरवळ’ मध्ये अपंग कवि-कवियत्रींच्या कवितांचा संग्रह आहे.
विसावा वर्धापन दिन ११ डिसेंबर २०१६ रोजी डोंबिवली येथील ‘स्वयंवर सभागृहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते श्री पुष्कर श्रोत्री उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्ष अॅड. खुरांगळे, मुख्य अतिथि डॉ. विश्वनाथन अय्यर सपत्नीक, विशेष निमंत्रित अॅड. केकनीस व अॅड. दिलीप भिंगारे यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. तसेच अभिनेत्री रागिणी सामंत आणि प्राजक्ता गणपुले यांनीही हजेरी लावली. अपंगालयातील सेवक वर्ग आणि आजी आजोबांच्या यानिमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच ‘भाऊ तिथे खाऊ’ ही खाद्यपदार्थांची स्पर्धा घेण्यात आली. श्री गजानन वैद्य ह्यांच्या अमेरिका भेटीनिमित्तच्या मुलाखतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर सदिच्छा शाळेच्या मुलांनी वेशभूषा सादर केली. अपंगालयातील रहिवाशांनी व सदस्यांनी अपंगालायच्या कार्यावर आधारित मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला.त्यानंतर अंदमान सहलीला गेलेल्या अपंग व्यक्तींच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला व त्याची सांगता वीर सावरकरांच्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ ह्या गीताने झाली. या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर भरारी संस्थेची माहिती देणारा दहा मिनिटांचा महितीपट दाखविण्यात आला. नंतर अॅड. केकनीसयांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. दोन गरजू दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी सायकली आणि ठाणे येथील एका दिव्यांग गृहिणीला कुटुंब चालवण्यासाठी घरघंटी विकत घेण्यासाठी धनादेश सुपूर्द केला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रथितयश पत्रकार व डोंबिवलीकर श्री जयप्रकाश प्रधान यांचा ऑफ बिट भटकंती ह्या आगळया वेगळ्या जगाच्या सफारीवर आधारित स्लाइड शो चा कार्यक्रम झाला.
१६ जानेवारी २०१६ रोजी पोपटीचा रंगतदार कार्यक्रम संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. सौ. अंजली आपटे यांच्या राहत्या घरामागील मोकळ्या जागेत संपन्न झाला.
२८ मार्च २०१७ रोजी डोंबिवलीच्या नववर्ष शोभायात्रेत प्रतिवर्षीप्रमाणे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यां नी व अपंगालयातील रहिवाशांनी उस्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कचरा वर्गीकरणावर आधारित एक पथनाट्य चौकाचौकात भरारीच्या कर्मचार्यांानी सादर केले. दोन टेम्पो ज्यावर स्वच्छता अभियानावर आधारित संदेश फलक लावले होते. तीन ट्रायसिकल व एक रिक्षाही यात्रेत सामील झाली होती.
दरवर्षी प्रमाणे नाताळ, रामनवमी,संक्रांतीचे, चैत्रातले,श्रावणातले हळदीकुंकू,आषाढी एकादशी,सत्यनारायण पुजा,राखी पौर्णिमा, रोजी भोंडला, दसरा, दिवाळीचा सण, कोजागिरी असे विविध कार्यक्रम झाले.
१७ सप्टेंबर २०१७ रोजी अपंगांची वर्षासहल डिमेलो सरांच्या एल.डी. रिसॉर्ट, अर्नाळायेथे आयोजित करण्यात आली. रिसॉर्ट मध्ये असलेल्या तरणतलाव आणि रेनड्रॉपने सर्वांना आनंद मिळवून दिला.
वार्षिक अहवाल काळात आंध्रकला समिती, ऊर्जा फाऊंडेशन,ग्लोबल मालवणी संस्था,गार्डियन स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक, सेवा सार्थक समिती आणि वीर पावलिया ग्रुप (बीजेपी अल्पसंख्याक मोर्चा) चे सदस्य,असोसिएशन ऑफ वुई क्लब्स ऑफ इंडियाच्या सौ. पद्मा नाईक, सौ. राधिका चिटणीस व इतर ७ जण, ओंकार स्कूलचे विद्यार्थी यांनी संस्थेला भेट दिली. त्यांनी विविध कार्यक्रम करून अपंगालयातील रहिवाशांचे मनोरंजन केले. तसेच शब्दांकुर प्रस्तुत सुमधुर कवितांचा बहारदार कार्यक्रम “ओंजळीतील शब्दफुले” – सौ. चैत्राली जोगळेकर, विजया जोशी आणि मानसी चाफेकर यांनी स्वरचित कविता सादर केल्या.
३० जुलै २०१७ रोजी प्रथमच गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
६ ऑक्टोबर २०१७ रोजी शांताबाई पेंडसे आजींचा ९५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
एकविसावा वर्धापन दिन १७ डिसेंबर २०१७ रोजी डोंबिवली येथील ‘स्वयंवर सभागृहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री विजय गिरिधरलाल सहेता, व्यवस्थापकीय संचालक, कनेक्टवेल इंडस्ट्रीज प्रायवेट लिमिटेड उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्ष श्री केशव दत्तात्रय परांजपे, प्रिन्सिपल, कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, भाईंदर आणि विशेष अतिथी श्री मयूर दुमासिया, लेक्चरर, अभिनव कॉलेज, भाईंदर व कर्णबधिर कु. अपूर्वा जोशी, ठाणे यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील बालपणीची येसू कु. आभा बोडस ही सुद्धा कार्यक्रमास उपस्थित होती. अपंगालयातील सेवक वर्ग आणि आजी आजोबांच्या यानिमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच ‘भाऊ तिथे खाऊ’ ही खाद्यपदार्थांची स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विविध शाळांच्या वेशभूषा व ग्रुप डान्सच्या स्पर्धा झाल्या. त्यानंतर भरारीतील आज्या, सेविका आणि कार्यकर्ते व सदस्य यांनी सोमण आजीच्या वाढदिवसावर आधारित एक नाटुकले सादर केले. सेविकांनी एकवीरा आईच्या गाण्यांवर नृत्य केले. नंतर भरारीची माहिती सांगणारी दहा मिनिटांची चित्रफीत दाखवण्यात आली. प्रमुख पाहुणे श्री सहेता यांनी २१ व्या वर्धापन दिनानिमित्त स्मरणीकेचे प्रकाशन केले. प्रकाशन सोहळ्याच्या होडीची संकल्पना सौ. संध्या प्रधान यांची होती. दोन दिव्यांग व्यक्तींना श्री सहेता यांच्याहस्ते व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. माननीय महापौर श्री राजेंद्र देवळेकर यांनीही वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि भरारीच्या कार्याचे कौतुक करतानाच भविष्यात शासनाकडून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. अपंगालयातील सेविका सौ. वैजयंती महाडीक आणि सौ. संगीता त्रिपाठी यांनी अपंगालयात झालेल्या शॉर्टसर्किटच्या वेळेस दाखविलेल्या प्रसंगावधानाबद्दल त्यांचे प्राचार्य परांजपे यांनी कौतुक केले. दरवर्षीप्रमाणे एका कार्यकर्त्याचा आणि एका सेविकेचा त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्री हेमंत देशपांडे यांच्या दोन्ही मुलांनी कु. चैत्रा आणि आदित्य यांनी बच्चे मन के सच्चे हा दृकश्राव्य गाण्याचा कार्यक्रम सादर केला. शेवटी नृत्य-चित्ररंग हा जुन्या नव्या चित्रपटातील बहारदार नृत्यगीतांवर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम सौ. संध्या प्रधान, श्री अजित प्रधान आणि श्री हेमंत देशपांडे यांनी सादर केला.
१८ मार्च २०१८रोजी डोंबिवलीच्या नववर्ष शोभायात्रेत प्रतिवर्षीप्रमाणे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यां नी व अपंगालयातील रहिवाशांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
वार्षिक अहवाल काळात नाताळ, सरत्या वर्षाला निरोप,रामनवमी, संक्रांतीचे,गजानन महाराज प्रकट दिन,चैत्रातले, श्रावणातले हळदीकुंकू, आषाढी एकादशी,स्वातंत्र्य दिन,सत्यनारायण पुजा, राखी पौर्णिमा, रोजी भोंडला, दसरा, दिवाळीचा सण, कोजागिरी असे विविध कार्यक्रम झाले.
०२ सप्टेंबर २०१८रोजी अपंगांची वर्षासहल बदलापूर येथील ‘वृंदावन रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आली. रिसॉर्ट मध्ये असलेल्या तरणतलाव आणि रेनड्रॉपने सर्वांना आनंद मिळवून दिला. दिव्यांग आणि कार्यकर्ते मिळून ५० जण सहभागी होते.
वार्षिक अहवाल काळात अपंगालयात महाजन, भोळे, श्रीमती हेमा चौधरी, विनायक थत्ते कुटुंबीय आणि अजित प्रधान कुटुंबीय यांनी सर्वांना भोजन दिले. तसेच सेविका सौ. सुजाता सावंत यांचा वाढदिवस, सचिव भावे मावशी पणजी आजी झाल्याबद्दल आनंद सर्वांसोबत साजरा केला. ब्लॉसम स्कूल, डोंबिवलीचे विद्यार्थी, सारा आकाश संस्थेचे कार्यकर्ते, आदर्श ज्येष्ठ मंडळाचे सदस्य, ऊर्जा फाऊंडेशन, ओंकार विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, पाथ ऑफ ब्लीस संस्था यांनी अपंगालयास भेट दिली व येथील रहिवाशांचे विविध कार्यक्रम करून मनोरंजन केले. ऊर्जा फाऊंडेशन संस्थेने भरारीच्या कामकाजाला उपयोगी पडेल यासाठी प्रिंटर देणगी म्हणून दिला.
बाविसावा वर्धापन दिन १६ डिसेंबर २०१८ रोजी डोंबिवली येथील ‘स्वयंवर सभागृहात संपन्न झाला. सर्वश्री उदय सबनीस, विघ्नेश जोशी आणि प्रथमेश देशपांडे हे कलाकार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री नरसिंह हेगडे यांना अचानक गावी जावे लागल्याने त्यांच्या प्रतिंनिधी म्हणून त्यांच्या पत्नी सौ. गंगा हेगडे या उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून श्री मधुकर सात्विक हे चिंचवड येथून आले होते. अध्यक्ष म्हणून डॉ. अनिल हेरूर उपस्थित होते. अपंगालयातील सेवक वर्ग आणि आजी आजोबांच्या यानिमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच ‘भाऊ तिथे खाऊ’ ही खाद्यपदार्थांची स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात के. बी. वीरा संस्थेच्या मतिमंद आणि मुकबधिर शाळेच्या विद्यार्थ्यानी एकपात्री प्रयोग,वेशभूषा व गाणी सादर केली. त्यानंतर सेविकांनी पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा या गाण्यावर नृत्य केले. नंतर भरारीची माहिती सांगणारी दहा मिनिटांची चित्रफीत दाखवण्यात आली. श्री उदय सबनीस यांनी २२ व्या वर्धापन दिनानिमित्त स्मरणीकेचे प्रकाशन केले. प्रकाशन सोहळ्याच्या नारळ वाढवण्याची संकल्पना सौ. संध्या प्रधान यांची होती. दोन दिव्यांग व्यक्तींना श्री सहेता यांच्याहस्ते व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे या त्रयीच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांना त्यांच्या गाण्यांनी आदरांजली वाहण्यात आली. अपंगालयातील सदस्यांनी त्यांची गाणी म्हटली. भावे मावशींनी गायलेल्या नाच रे मोरा या गाण्यावर सेविकांनी नाच केला. यानंतर वैद्यकाकांनी पेटीवादन केले. सौ. अंजली चक्रदेव आणि सहकारी यांनी गाण्यांची आदरांजली वाहिली. कार्यक्रमाची सांगता सेतू बांधारे या गीतरामायणातील गीताने झाली.
६ जानेवारी २०१९ रोजी पोपटीचा रंगतदार कार्यक्रम संस्थेच्या चिरड येथील प्रस्तावित नवीन जागेत संपन्न झाला. ८०-८५ जण कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळेस हिन्दी मराठी गाणी गाऊन तसेच संगीत खुर्ची, गाण्याच्या भेंड्या खेळून पोपटीच्या भोजनाचा सर्वांनी आनंद घेतला.
६ एप्रिल २०१९रोजी डोंबिवलीच्या नववर्ष शोभायात्रेत प्रतिवर्षीप्रमाणे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यां नी व अपंगालयातील रहिवाशांनी उस्फूर्त सहभाग घेतला. पाणी वाचवा आणि एक पणती सैंनिकांसाठी असा यावेळचा विषय होता. वार्षिक अहवाल काळात दत्तजयंती,नाताळ, सरत्या वर्षाला निरोप, महाशिवरात्र, रामनवमी, संक्रांतीचे,रमजान ईद, वटपौर्णिमा, चैत्रातले, श्रावणातले हळदीकुंकू,गुरुपौर्णिमा,आषाढी एकादशी,स्वातंत्र्य दिन, सत्यनारायण पुजा, राखी पौर्णिमा, गणेश चतुर्थी, भोंडला, दसरा, दिवाळीचा सण, कोजागिरी असे विविध कार्यक्रम झाले.
वार्षिक अहवाल काळात अपंगालयात पिंपुटकर आजी, सेविका रंजना व्यवहारे हिचा मुलगा ईश्वर, ऋषिकेश थत्ते, प्रल्हाद पवार, श्रीमती मंगला जोशी, श्री सुबोध साटम, सेविका वैजयंती महाडीक, वडदकर आजी, संगीता त्रिपाठी, भरारीचे एक हितचिंतक सौ. संध्या प्रधान, डॉ. अंजली आपटे, विनायक थत्ते, सेविका लीला शिंगोळे, भावे आजी, युवराज सिंह हा छोटा मुलगा, साळुंखे परिवाराने मयूरेश आणि शुभम, या सर्वांचे वाढदिवस अपंगालयात साजरे केले गेले.
सौ. सीमा जोग यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, श्री उदय पाटील यांचा मुलगा वेदान्त पाटील याचा वाढदिवस, वडदकर आजीच्या नातीचे (मेखला) लग्नानिमित्त, भारती मुश्रीफ मामी यांच्या नातवाच्या बारश्यानिमित्त अपंगालयात जेवण दिले.
तसेच हितचिंतक श्री शंकर चौधरी,सौ. चित्रा महाजन, श्री सचिन भोळे, अविनाश पाटील,, प्रमोद आणि नीता श्रोत्री, राजेश पाटील,श्रीमती गंधाली बर्वे,श्रीमती शोभा पाटणकर, सौ. सुनीता कुरडुकर व सौ. प्राजक्ता पाठक,श्री उदय पाटणकर, श्री नरेंद्र कुलकर्णी, सौ. रेखा पाटील, सौ. संगीता माधोपूरकर यांच्यातर्फे विविध प्रसंगानुसार अपंगालयात नाश्ता, जेवण, मिठाई देण्यात आली.
क्षणभर विश्रांती या मंडळाचे १५ कार्यकर्ते, रोशनी पाटेकर व सहकारी, राष्ट्रीय सेवा संघ, निळजे येथील १५-२० जणांचा ग्रुप,रोटरी क्लब ग्रीन पॅन्स, ठाणे चे १८ सदस्य,इंस्टा पेंट आर्ट च्या मीनाक्षी मोरे व त्यांचे २०-२२ सहकारी,ऊर्जा फाऊंडेशनचे पदाधिकारी, ओंकार शाळेतील इयत्ता १० वी चे ४० विद्यार्थी व दोन शिक्षक, हव्यक भजनी मंडळ यांनी अपंगालयाला भेट दिली व सर्वांचे मनोरंजन केले.
२६ जून २०१९ रोजी श्री भालके गुरुजी यांच्याकडून अपंगालयात उदकशांत करण्यात आली. आपले कार्यकर्ते श्री व सौ. थत्ते यांच्या हस्ते उदकशांत संपन्न झाली. श्री व सौ. मुश्रीफ ह्यांचे मेहुण होते. नंतर सर्वांना पुरणपोळीचे जेवण देण्यात आले. सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
२३ वा वर्धापनदिन १५ डिसेंबर २०१९- अहवाल
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी २.३० वाजता सर्व उपस्थितांच्या सहभागाने झाली. उपस्थितीत सर्व सभासदांसाठी दोन स्पर्धा घेण्यात आल्या. तिसरी स्पर्धा "भाऊ तिथे खाऊ ही पोहे हा मुख्य घटक असलेले गोड आणि तिखट अश्या पदार्थांची ठेवली होती. सौ. दिपाली गुप्ते, आणि सौ. शमा देशपांडे हयांनी परीक्षक म्हणून काम केले. तसेच अपंगालयातही सेवक वर्गासाठी आणि इतर सदस्यांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या.
दुपारी सव्वाचार ते साडेचार च्या दरम्यान कार्यक्रमाचे मान्यवर अध्यक्ष म्हणून डॉ. विनोद इंगळहळ्ळीकर, प्रमुख पाहुणे म्हणून मिसेस उमा अडुसुमिली, अभिनेते श्री देवेंद्र दोडके आणि विशेष अतिथी कु. गीता कॅस्टीलिनो आणि गायिका शरयू दाते हयांनी अपंगालयाला भेट दिली व ते सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा आणि नाच गाणी सादर केली. भरारीतील सेविकांनी ईशस्तवनपर नृत्य सादर केले आणि लटपट लटपट कमर दामिनी या गाण्यावर नृत्य सादर केले. त्यानंतर भरारीतील सदस्य आज्या आणि कर्मचारी वर्ग यांनी "असंबध्द्ध संवाद" ही नाटुकली सादर केली. मान्यवर आणि उपस्थित सर्वांचे चांगलेच मनोरंजन झाले.
यानंतर संस्थेच्या उपाध्यक्षा अमिता कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मोजक्या शब्दात संस्थेच्या यावर्षीच्या कार्याचा आढावा घेतला व भावी कार्यक्रमांचा व प्रकल्पांचा उल्लेख केला.
प्रमुख पाहुणे डॉ. विनोद इंगळहळ्ळीकर यांनी वर्धापनदिनानीमित्त स्मरणिकेचे प्रकाशन केले. त्यांच्या हस्ते व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर अध्यक्ष आणि इतर मान्यवरांची भाषणे झाली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या निबंधांमुळे मार्च २३, २०२० रोजी अपंगालय तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवावे लागले. शासनाचे सर्व नियम पाळून आणि सर्व प्रकारची आरोग्यविषयक काळजी घेत १ डिसेंबर २०२० रोजी अपंगालय पुन्हा चालू करण्यात आले. सुरुवातीस ३ पेशंटपासून सुरू झालेले अपंगालय आता १३ पेशंटची सर्व प्रकारे काळजी घेत आहे. अपंगालय कधी सुरु होते याची वाट पहात इतर कुठल्याही संस्थेत जाण्यास ठाम नकार देऊन अपंगालय सुरु झाल्याबरोबर अपंगालयात परत आलेल्या श्रीमती मंगला साठे यांनी ५ डिसेंबर २०२० रोजी समाधानाने अखेरचा श्वास घेतला.
७ जानेवारी २०२१ - मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन करण्यात आले.
१९ फेब्रुवारी २०२१ - हळदीकुंकू समारंभ साजरा झाला १३ मार्च २०२१ - गुढीपाडवा साजरा करण्यात आला.
२३ मार्च २०२१ - रामनवमी निमित्त रामजन्म सोहळा संपन्न झाला.
२७ एप्रिल २०२१ - हनुमान जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळेस सर्वांनी हनुमान चालीसा पठण केले.
२२ ऑगस्ट २०२१ राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळेस सेवक वर्गाने सर्व पेशंटना आणि आलेल्या इतर सहकार्याना राख्या बांधल्या.
१० सप्टेंबर २०२१ - दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या वर्षी सौ. राधा खटनहार यांनी पितळेचा गणपती गणेशोत्सवासाठी भेट म्हणून दिला.
१५ ऑक्टोबर २०२१ दसरा साजरा करण्यात आला. सर्वाना गोडधोडाचे जेवण देण्यात आले आणि एकमेकांना सोने वाटून आनंद साजरा केला.
२ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०२१ दिवाळी साजरी करण्यात आली. रोज गोडाचे जेवण, सकाळी चिवडा, चकली, लाडू याचा फराळ देण्यात आला. सर्व सेवक वर्गाला दिवाळीनिमित्त मिठाई देण्यात आली.
५ डिसेंबर २०२१ : २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
दुपारी सव्वाचार ते साडेचार च्या दरम्यान कार्यक्रमाचे मान्यवर अध्यक्ष म्हणून चितपावन संघाचे अध्यक्ष श्री माधव घुले व विशेष अतिथी अंधांसाठी काम करणाऱ्या सरोज नेरुरकर उपस्थित झाले. सर्वांनी नाश्ता व चहापान केले आणि मुख्य कार्यक्रमास ४.४५ वाजता सुरवात झाली. भरारीतील सेविकानी नृत्य सादर केले आणि नंतर भरारीतील सदस्य आज्या आणि कर्मचारी वर्ग यांनी व्हिडीओ द्वारे एक नाटुकली सादर केली. मान्यवर आणि उपस्थित सर्वांचे चांगलेच मनोरंजन झाले.
यानंतर संस्थेच्या अध्यक्ष अमिता कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मोजक्या शब्दात संस्थेच्या यावर्षीच्या कार्याचा आढावा घेतला व भावी कार्यक्रमांचा व प्रकल्पांचा उल्लेख केला. तसेच संस्था दिव्यांगांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते याचाही उल्लेख केला. नवीन जागेत गेल्यावर नवनवीन प्रकल्प सुरू करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. डे केअर सेंटर हा असाच एक प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे श्री माधव घुले यांनी भरारीच्या २५ व्या वर्धापनदिनानीमित्त स्मरणिकेचे प्रकाशन केले. त्यानंतर त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच संस्थेच्या कार्याबद्दलही त्यांनी प्रशंसोद्गार काढले अपंगालयातील सेवक वर्ग आणि कार्यकर्ते यांच्या कार्याचे कौतुक केले. वर्धापनदिनानिमित त्यांनी संस्थेच्या कार्याला आणि भावी उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते tricycle चे वाटप करण्यात आले.
यानंतर प्रमुख पाहुणे श्री जयवंत ढाणे यांना काही कारणामुळे येणे शक्य झाले नाही. त्यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविला.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
१० जानेवारी २०२२ चित्तरंजन करंदीकर यांच्या हस्ते भरारीत उदकशांत करण्यात आली.
१४ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२२ संक्रांत ते रथसप्तमी. या काळात ज्या सहकार्यानी आणि व्यक्तींनी अपंगालयास भेट दिली त्या सर्वाना तिळगुळ देण्यात आला. महिलांना हळदीकुंकू व वाण देण्यात आले. २ एप्रिल २०२२ - गुढीपाडवा साजरा करण्यात आला. या दिवशी गुढी उभारण्यात आली आणि गोडाचे जेवण करण्यात आले.
१० एप्रिल २०२२ - रामनवमी साजरी करण्यात आली. रामजन्माचा सोहळा करून सर्वाना सुंठवडा देऊन गोडाचे जेवण देण्यात आले.
१२ एप्रिल २०२२ ठाणे येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम करण्यात आला. सौ. विजया माणगावकर यांचे भजनी मंडळ होते. सर्वजण भक्तिरसात रंगून गेले.
२० जून २०२२ - चिरड येथील भरारीच्या नवीन जागेचे भूमिपूजन झाले. ठाण्याचे कलेक्टर श्री राजेश नार्वेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
१० जुलै २०२२ - सत्यनारायण पूजा संपन्न झाली. श्री जयेश जोशी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. श्री व सौ. निलेश काळे यांचे मेहूण होते.
२ ऑक्टोबर २०२२ - डॉ. गोखले यांनी ४ महिन्यांच्या नर्मदा परिक्रमा काळातील आलेले अनुभव व संपूर्ण परिक्रमेचे वर्णन केले. वर्णन ऐकता ऐकता सर्वजण परिक्रमेचा अनुभव घेत होते.
२२ ते २६ ऑक्टोबर २०२२ दरवर्षी प्रमाणे दिवाळी साजरी करण्यात आली. रोज गोडाचे जेवण, सकाळी चिवडा, चकली, लाडू याचा फराळ देण्यात आला. सर्व सेवक वर्गाला दिवाळीनिमित्त मिठाई देण्यात आली.